रोहित कदम, साम टीव्ही
मनोज जरागेंच्या आंदोलनाची दखल घेऊन महायुती सरकारनं ओबीसींच्या शैक्षणिक सवलती मराठा समाजालाही लागू केल्या. मात्र यावरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण ओबीसी नेत्यांनी याला आक्षेप घेतलाय. ओबीसींचे निकष मराठा समाज पूर्ण करतो का? असा सवाल ओबीसी नेत्यांनी केलाय. तसंच महायुती सरकार आणि जरांगेंमध्ये साटलोटं असल्याचा आरोपही ओबीसी नेत्यांनी केलाय. त्यामुळे राज्य सरकारनं लागू केलेल्या आठही योजना वादात सापडण्याची चिन्ह आहेत.
महायुती सरकारनं ओबीसींच्या कोणत्या शैक्षणिक योजना मराठ्यांसाठी लागू केल्या आहेत ते पाहूयात...
मराठा समाजासाठी
OBCच्या 8 योजना
1 शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना
2 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
3 विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींच्या प्रतिपूर्ती योजनांचा लाभ
4 परराज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्यांसाठी योजना
5 OBC प्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळणार
6 CAPनंतर रिक्त जागांवर संस्थेच्या स्तरावर प्रवेशाला मान्यता
7 सर्व OBC सवलती आणि सुविधा मराठा समाजालाही लागू
8 मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
राज्य सरकारच्या निर्णयाचं मनोज जरांगेंनी स्वागत केलंय. मात्र कुणबी दाखले मिळालेल्यांची तातडीनं जात पडताळणी करा अशी मागणी जरांगेंनी केलीय. मराठ्यांना लागू केलेल्या ओबीसी सवलतींना ओबीसी नेत्यांनी दर्शवलेला विरोध आणि जरागेंनी पुन्हा कुणबी दाखल्यांवरून सरकार दिलेला इशारा पाहता..पुढच्या काळात पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.