मराठा क्रांती मोर्चाकडून सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन! लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चाकडून सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन!

मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर, जालना मराठा क्रांती मोर्चाकडून सोमैय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन!

लक्ष्मण सोळुंके

जालना : भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर काल आरोप करत नांगरे पाटील हे राज्य सरकारचे हस्तक असल्याचं म्हटलं होतं. सोमैय्या यांच्या आरोपानंतर मराठा क्रांती मोर्चानं आज जालन्यात किरीट सोमैय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं.

हे देखील पहा :

यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचा निषेध नोंदवत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. जालना शहरातील अंबड चौफुली चौकात हे आंदोलन करण्यात आले.

मुंबई मधील २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यात नांगरे पाटील यांनी अतिरेक्यांशी प्राणपणे लढा दिल्याने राज्य सरकारने त्यांचा सन्मान केला. अशा नांगरे पाटलांवर नाहक आरोप करुन त्यांना बदनाम करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, सोमय्या यांनी या प्रकरणी माफी न मागितल्यास त्यांच्या घरावर काळी शाई फेकू असा ईशारा आंदोलकांनी दिलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT