Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: सारथीच्या विद्यार्थ्यांना जरांगे पाटील यांनी झापलं; म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा की तुमचा...

Maratha Aarakshan: दोन वेळा तुमची दीपक केसरकर यांच्यासोबत बैठक झाली, तुम्ही तोड बदलून बदलून येतात. त्यानंतर मग इथे देखील येता, अशा शब्दांत जरांगेंनी विद्यार्थ्यांना सुनावलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

लक्ष्मण सोळुंके


Sarthi Students:

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कालपासून महाराष्ट्रातून सारथीचे विद्यार्थी अंतरवाली सरांटी गावात उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. हे विद्यार्थी आंदोलन स्थळी आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त करत त्यांना जाब विचारलाय.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा की तुमचा? असा प्रश्न जरांगे पाटलांनी सारथीच्या विद्यार्थ्यांना विचारला आहे. दोन वेळा तुमची दीपक केसरकर यांच्यासोबत बैठक झाली, तुम्ही तोड बदलून बदलून येतात. त्यानंतर मग इथे देखील येता, अशा शब्दांत जरांगेंनी विद्यार्थ्यांना सुनावलं आहे.

तुम्ही संशोधन करुन मोठे होणार, तुम्ही तुमच्या पगाराबाबत बोलताय. इथं महाराष्ट्रातील मराठा समाजाचा प्रश्न महत्वाचा आहे. मागासवर्गीय आयोगाचा सर्व्हे झाला आहे. त्यात अनेक मराठा समाजाचे प्रश्न आहेत. तो अहवाल सरकारने स्वीकारला की सर्व मराठा समाजाचे प्रश्न सुटणार असल्याचं म्हणत या विद्यार्थ्यांना तुम्ही मराठा समाजाच्या प्रश्नावर उपोषणाला बसला की स्वतःच्या प्रश्नासाठी, असं विचारत जरांगेंनी त्यांना झापलंय.

तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करायला हवी. तुम्ही फक्त इथं बसून तुमच्या मागण्या मांडत आहात. अशाने समजाचं कसं भलं होणार? असा प्रश्न देखील मनोज जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांना विचारला आहे.

सारथी विद्यार्थ्यांच्या मागण्या कोणत्या?

सारथीच्या 2023 च्या बॅचला सरसकट शिष्यवृत्ती मिळावी. नोंदणी दिनांकपासून शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जरांगे पाटील यांना पाठींबा देत उपोषण सुरू केलं आहे. अंतरवाली सराटी गावात जवळपास १३३९ सारथीच्या विद्यार्थ्यांनी आज उपोषणला पाठिंबा दिला. यातील जवळपास 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मनोज जरागे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. यावरून माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांची कानउघडणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT