sangli, maratha andolan saam tv
महाराष्ट्र

Sangli Band News : सांगली बाजारपेठेत कडकडीत बंद, शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

Maratha Andolan : मराठा आंदाेलक आज बाईक रॅली काढणार.

विजय पाटील

Maratha Andolan Latest Marathi Updates : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीहल्लाचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (गुरुवार) सांगली शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद (sangli band news) पाळण्यात आला आहे. या बंद कालावधीत काेणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाेलिसांनी चाेख बंदाेबस्त ठेवला आहे. (Maharashtra News)

सकल मराठा समाजाने केलेल्या आवाहनानूसार सांगली शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच गावागावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. बहुतांश रस्त्यावर शुकशुकाट आहे. शाळा, कॉलेज व्यवस्थापनाने आज शैक्षणिक संस्था बंद ठेवल्या आहेत.

आज जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आंदाेलकांनी रास्ता रोको आंदोलनाचे नियाेजन केले आहे. त्याचबरोबर सांगली मध्ये 10 वाजता बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या आंदोलनाला सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

शिवप्रतिष्ठानचा बंदला पाठिंबा

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात यावे असे आवाहन देखील केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुस्तकांच्या नावाखाली पालकांना कोट्यवधींचा गंडा; 'साम' इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: रायगड शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक फेरबदल

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता येण्यास उशिर का? कितीने वाढणार पगार? वाचा सविस्तर

World Homeopathy Day 2026: होमिओपॅथीची औषधं घेताना कोणती काळजी घ्यावी? वाचा डॉक्टरांचा सल्ला

Monalisa : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा नवरा जेलमध्ये जाणार? पोलिसांत गुन्हा दाखल, अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT