Jalna News Manoj Jarange Patil rally in antarwali sarathi Maratha reservation Updates Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange: लाख मराठा! अंतरवाली सराटीच्या सभेतील गर्दी बघून मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर

Jalna News: आज आंतरवाली सराटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Ruchika Jadhav

Maratha Aarakshan:

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज गेल्या अनेक दिवसांपसून लढा देत आहे. आरक्षणासह कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. आज आंतरवाली सराटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेतील मराठा बांधवांची गर्दी पाहून मनोज जरांगेंना अश्रू अनावर झालेत. (Latest Marathi News)

अंतरवाली सराटी गावात आज जंगी सभेचे आजोजन करण्यात आलं आहे. या सभेला सकाळपासूनच लाखोंच्या संख्येने मराठा जनसमुदाय उपस्थित राहिलाय. मराठ्यांचा लाखोंचा जनसमुदाय पाहून यावेळी जरांगेंना काहीवेळ अश्रू अनावर झाले.

मनोज जरांगे यांनी ११.३० वाजता मराठा बांधवांना संबोधित करण्यास सुरूवात केली. दुपारच्या उष्णतेमुळे मनोज जरांगे यांनी सभेसाठी टाकण्यात आलेला मंडप काढण्यास सांगितला. मंडप काढल्यानंतर उन्हामुळे दोन व्यक्तींची प्रकृती बिघडली. त्यामुळे सभास्थळी तात्काळ अॅम्बुलन्समधून उपचार देण्यात आलेत.

राज्यात सध्या ऑक्टोबर हिट सुरू आहे. या हिटसह दुपारी १२ च्या सुमारास सभा सुरू असल्याने उन्हाचा तडाखा वाढला आहे. मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटलांच्या सभेला लाखोंच्या सभेने मराठा समाज एकवटला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे ४० दिवसांचा वेळ मागितला होता. या काळात आपण आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू असं आश्वासन देखील राज्य सरकारने दिलं होतं. आता ३० दिवसांचा कालावधी आज संपला आहे आणि फक्त १० दिवस शिल्लक आहेत. मात्र अद्याप आरक्षणाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. त्यामुळे मनोज जरांगेंनी आज पुन्हा एकदा भव्य सभा घेतली आहे. जरांगे या सभेत काय बोलणार आणि पुढे काय निर्णय घेणार याकडेच संपूर्ण रज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रामकुंडावर ठाकरे सेनेचं आंदोलन

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

जिम-डाएटिंगचा खर्च वाचेल! दररोज ३० मिनिटे सायकल चालवल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळेल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचे निधन, महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा

SCROLL FOR NEXT