Manoj Jarange On Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange On Raj Thackeray: आमचा बोलवता धनी मराठा समाजच; मनोज जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Manoj Jarange News: आमचा बोलविता धनी मराठा समाजच आहे, अशा शब्दांत जरांगेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वेगळीच शंका व्यक्त केलीये. या सर्वांमागे जरांगे पाटील आहेत की आणखीन कोण आहे? त्यांचा बोलवता धनी कोण? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. त्यावर जरांगे पाटलांनी राज ठाकरेंना प्रखर शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमच्या पाठीमागे कोणीतरी असल्याचे आरोप आतापर्यंत खुप जणांनी केले आहेत. त्यामुळे आमच्या पाठी कोण आहे याचा शोध राज ठाकरेंनी घ्यावा आणि आम्हाला पण सांगावे. मराठा समाजाच्या पाठीमागे आम्हीच आहोत. आमचा बोलविता धनी मराठा समाजच आहे, अशा शब्दांत जरांगेंनी राज ठाकरेंना (Raj Thackrey) प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंचं लवकरच मतपरिवर्तन होणार

राज ठाकरे यांनी आधीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. आता मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला दिलेला पाठिंबा कायम ठेवावा अशी विनंती मी त्यांना करतो. लवकरच त्यांचं मतपरिवर्तन होईल. अशी प्रतिक्रीया जरांगे पाटील यांनी दिली आहे.

जरांगे पाटील यांनी जेजुरीमध्ये खंडेरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. खंडेरायाकडे त्यांनी आरक्षणाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे सर्वांना सुबुद्धि देण्याचं साकडं घातलंय.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो. तेव्हा अशापद्धतीने आरक्षण मिळणार नसल्याचं मी सांगितलं होतं. परंतु आता आरक्षणाच्या या लढ्यात जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागे आणखी कोण आहे?", असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.

"या मुद्दयावरून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायचे असे आहे का? कारण निवडणुकीच्या तोंडावर राज्यात या सगळ्या गोष्टी होतायेत. हे चित्र इतकं सरळ दिसत नाही. त्यामुळे कालांतराने यामागे कोण आहे हे कळेलच. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीही वेगळे मुद्दे काढले जातायत." अशा शंका राज ठाकरेंनी उपस्थित केल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT