Maratha Reservation Manoj Jarange Patil saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे मुंबईत करणार आंदोलन, तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर सरकारला दिला गंभीर इशारा

Manoj Jarange Patil: या पुढचं आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर होणार आहे. सरकार कुणाचंही असलं तरीही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटी यांनी दिलाय.

Bharat Jadhav

मराठा आरक्षणासाठी इथून पुढचे सामुहिक आंदोलन मुंबई येथे होणार असुन सरकार कुणाचे ही असो मुडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. जरांगे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते दरम्यान त्यांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला गंभीर इशारा दिलाय.

महाराष्ट्रामध्ये मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदार सुद्धा निवडुन आणले आम्ही विधानसभा निवडणुकीच्या फॉर्मुल्यात नव्हतो नाहीतर सुफडा साफ केला असता. यापुढे आरक्षणासाठी सामुहिक उपोषण मुंबई येथे आझाद मैदानावरती होऊ शकते. ही आरक्षणाची चळवळ थांबवणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी तुळजापूरात माध्यमांशी बोलताना सांगितले. जरांगे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते दरम्यान त्यांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

मनोज जरांगे पाटील यांचा महायुतीला इशारा

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना महायुतीला इशारा दिला होता. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर अपयशी झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे फॅक्टर अपयशी ठरलेल्या लोकांवर त्यांनी टीका केली. कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावा.

पण श्रेय घेताना लोकांनी आपली औकात बघितली पाहिजे. काल सगळे म्हणत होते जरांगे फॅक्टर फेल झाला आम्ही मैदानातच नाही तर कसं फेल झालो. कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय आम्हाला त्याचा फरक पडत नाही. आले तेवढे मराठा फॅक्टरमुळे आलेत. जरांगे फॅक्टर कळायला हयात जाईल तुमची, असे मनोज जरांगे म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Maharashtra News Live Update:घोडबंदर रोडवरील काँक्रिटीकरणामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 25 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत

आणखी एक पक्ष फुटणार? भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह ३० कोटींची ऑफर; आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT