Manoj Jarange Patil on Chhagan bhujbal Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का स्थान नाही? मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? VIDEO

Manoj Jarange Patil on Maratha Reservation: मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. अशातच भुजबळ यांना डावलण्यात आलं, यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.

Bhagyashree Kamble

मनोज जरांगे यांना अगांवर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. अशातच भुजबळ यांना डावलण्यात आलं, यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही, हा आमचा प्रश्न नसून, मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला घेणं देणं नसल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच त्यांनी उपोषणाचाही इशारा दिला.

नागपुरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान, मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. १७ डिसेंबरला मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार असून, या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील सामूहिक आमरण उपोषणाला बसण्याची तारीख जाहीर करणार आहेत.

तसेच ज्यांना स्वेच्छेने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल असं देखील जरांगे पाटील म्हणाले. उपोषणाला बसण्यासाठी कोणाला बंधन घालण्यात येणार नाही. सामूहिक उपोषणाला जर कुणी नाही बसलं तरी मी बसणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. उपोषणाला बसा म्हटलं तर घरा घरांतून मराठे उपोषणाला बसतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हिवाळी अधिवेशनात तोडगा काढावा

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. १५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. तसंच हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघेल. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT