Jarange Patil Saam Tv News
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'फडणवीस साहेब तुमची नियत चांगली नाही', डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटील कडाडले; आंदोलनाचा दिला इशारा

Manoj Jarange Protest: 'फडणवीस साहेब तुमची नियत चांगली नाही. तुमची जशी तुमच्या लेकीसाठी तळमळ आहे, तशी तळमळ आमच्या लेकरांसाठी असू द्या', अशी टीका जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.

Bhagyashree Kamble

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ६ दिवसांसाठी उपोषण केलं होतं. उपोषण सोडल्यानंतर प्रकृतीच्या बाबतीत कुरबुरी सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं. डिस्चार्ज दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय.

मराठा समाजातील काही तरूणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलीय. यावरून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच लवकरच आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय.

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, 'फडणवीस साहेब तुमची नियत चांगली नाही. तुमची जशी तुमच्या लेकीसाठी तळमळ आहे, तशी तळमळ आमच्या लेकरांसाठी असू द्या', असं जरांगे पाटील म्हणालेत. 'फडणवीस यांना बापाची माया आहे. वर्षावर जाणार पण मुलीची परीक्षा आहे, असे ते म्हणाले. लेक काय असते तुम्हाला कळालं , आमच्या लेकरांच्या आत्महत्या झाल्या. हे तुम्हाला कळत नाही. आमच्या लेकरांची माया का येत नाही? आरक्षण का देत नाहीत?' असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

'आमचं EWS तुम्ही घालवलं आणि खापर आमच्यावर फोडता. मराठे तरूण आत्महत्या करत आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तुम्ही आमच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय का घेतला नाही? हा भेदभाव का?' असा सवाल करत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत.

'स्वत:च लेकरू मोठं कराचं हा फडणवीस यांचा संदेश आहे. मराठ्यांनी यातून बोध घ्यावा. स्वत:च्या मुलांबाबत वेगळी वागणूक आणि दुसर्‍यांच्या मुलांबाबत वेगळी भूमिका. हे असं होत असेल तर, वेगळं आंदोलन करावे लागणार. लवकरच मी मुंबईत शिवाजीपार्क, आझाद मैदानाची पाहणी करायला जाणार. मैदान कधी पाहायला जाणार ही तारीख जाहीर करणार' असल्याचं जरांगे म्हणाले.

'एकाही विद्यार्थ्यानं आत्महत्या करू नये'

'माझी मराठा समाजाला विनंती आहे. आता माझी तब्येत बरी आहे. आता मला डिस्चार्ज मिळत आहे. मराठा समाजाच्या एकाही विद्यार्थ्यानं आत्महत्या करू नये. सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही. आंदोलनात असणाऱ्या आणि नसणाऱ्यांसाठी लढतोय', असं जरांगे पाटील म्हणालेत.

'आम्ही उपोषण केलं, शांतपणे आंदोलन केलं. २२ फेब्रुवारी ते २२ मार्चपर्यंत गाठी भेटी नियोजन करणार. राज्यातील प्रत्येक गावातील अडचणी आम्हाला समजायला हवीत. २२ फेब्रुवारी ते २२ मार्च या काळात छत्रपती भवन, शहागड पैठण फाटा या ठिकाणी अडचणी येऊन सांगा', असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: आताच सावध व्हाल, वारेमाप खर्च होणार, काहींना अचानक भरपूर पैसा मिळणार, वाचा राशीभविष्य

Goa Tourism : बोटीतून करा 'या' आयलंडची सफर, गोव्यात लपलंय निसर्गाचे सुंदर रत्न

Maharashtra Live News Update: सोलापुरातील नाथ संकुलातील ७ मजली इमारतीमध्ये लागली आग

दारू पिऊन सारखा त्रास द्यायचा; बायकोची सटकली, जबर मारहाणीत पतीचा मृत्यू

LPG Cylinder: बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

SCROLL FOR NEXT