Manoj Jarange Patil saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: ना महायुतीला, ना महाविकास आघाडीला... निवडणुकीसाठी कुणालाही पाठिंबा नाही, मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका

Manoj Jarange Patil : मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीलाही माझा पाठिंबा नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली मांडली.

Nandkumar Joshi

अक्षय शिंदे, जालना | साम टीव्ही

महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. माझा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसह कुणालाही पाठिंबा नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या नावानं पत्रकं प्रसिद्ध करून काही राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीत पाठिंबा असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. यानंतर मनोज जरांगेंनी स्वतः आपली भूमिका मांडली आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीला असा कोणालाही महापालिका निवडणुकीत माझा पाठिंबा नाही. माझे जुने व्हिडिओ कुणी व्हायरल करत असतील तर ते चुकीचे आहे, असे जरांगे म्हणाले.

माझ्या नावाने कुणी पत्रकं प्रसिद्ध करत असतील तर त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. जर कोणी स्थानिक पातळीवर कुणाला पाठिंबा दिला असेल तर, तो त्यांचा व्यक्तिगत विषय असेल. त्याचा आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असंही जरांगेंनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करू नका

मराठा समाज आरक्षणासाठी काही वर्षांपासून मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. याच मराठा आरक्षणाला आणि त्याची मागणी करणाऱ्या मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना सहकार्य करू नये, अशी मनोज जरांगेंची भूमिका आहे. सर्वांना विनंती आहे की निवडणुकीत आमचा कुणालाही पाठिंबा नाही. पण मराठा समाजालाचा विरोध करणारे आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे जे कोणी निवडणुकीत उभे असतील, त्यांना मात्र मराठा समाजाने सहकार्य करू नये, असे आवाहनही जरांगेंनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारने २ वर्षीय श्रृतिकाला चिरडलं, डॉक्टरविरोधात गुन्हा; थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: रायगडच्या दरी-डोंगरांत धबधबे प्रवाहीत; पर्यटनाला सुरुवात

Live Location Sharing : WhatsApp, Instagram वर तुम्हीही शोधू शकता मित्रांचे लाइव्ह लोकेशन; जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

Hindu Temple Tradition: मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्यांचा आशीर्वाद का घेतला जातो?

शिवसेनेच्या नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू; संशय आल्याने राऊत रुग्णालयात धडकले, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT