Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Beed Sabha: बीडच्या ९०० एकरमधील सभेत ६ कोटी मराठा एकवटणार; मनोज जरांगेंनी सांगितली रणनिती

Beed Maratha 900 Acre Sabha: अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या बैठकीला तब्बल १४ राज्यातील मराठा बांधव एकवटणार असल्याची माहिती देखील जरांगे यांनी दिली.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Manoj Jarange 900 Acre Sabha

एकीकडे लोकसभा निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बीडमध्ये तब्बल ९०० एकरमध्ये मराठा समाजाची विराट सभा होणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. या सभेला ६ कोटी मराठे एकवटणार अशी माहिती देखील जरांगेंनी दिली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात पत्रकारपरिषद घेतली. यावेळी मराठा समाजाची ९०० एकरमधील सभा नेमकी कशी असणार याबाबत जरांगेंनी माध्यमांना माहिती दिली. मराठ्यांच्या विराट सभेबाबत आज अंतरवाली सराटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचं जरांगेंनी सांगितलं.  

या बैठकीला तब्बल १४ राज्यातील मराठा बांधव एकवटणार असल्याची माहिती देखील जरांगे यांनी दिली. आजच्या कॅबिनेट बैठकीत सरकारनं सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी शेवटची विनंती जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केली. आज जर निर्णय घेतला तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेवून नाचतील. नसता तुमचा गुलाल पुसलाच समजा, असा इशारा ही त्यांनी सरकारला दिला.  (Latest Marathi News)

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला बदनाम करायच्या भानगडीत पडू नये. माझ्या नादी लागलात तर तुमचा राजकीय सुरडाच साफ करू, असा थेट इशारा देखील जरांगे यांनी फडणवीसांना दिला. तुमच्या अवती-भवती सगळे भ्रष्टाचारी आहेत. ६२ लोकांची यादी माझ्याकडे आली आहेत. त्याचाही आम्ही वापर करू शकतो, असंही जरांगे म्हणाले.

कॅबिनेटमध्ये सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, नसता आमचे दौरे बैठका सुरुच राहणार राहणार. अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत १४ राज्यातील मराठे येणार असून बीडमधील ९०० एकर जागेवरील सभेत ६ कोटी मराठे एकवटणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT