Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange News : मातोरीवरील दगडफेकीत मंत्री छगन भुजबळांचा हात? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, पाहा VIDEO

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मातोरी येथील दगडफेकीच्या घटनेत मंत्री छगन भुजबळ यांचाच हात असावा. त्यांनीच आपल्या लोकांना दगडफेक करायला लावली असेल, असे आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Satish Daud

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील मातोरी या गावात गुरुवारी दगडफेक झाली. डीजेच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना गंभीर आरोप केले.

मातोरी येथील दगडफेकीच्या घटनेत मंत्री छगन भुजबळ यांचाच हात असावा. त्यांनीच आपल्या लोकांना दगडफेक करायला लावली असेल, असे आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केले. भुजबळ यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत. त्यांनी आतापर्यंत जातीपातीचं राजकारण केलं आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे. बीडच्या पालकमंत्र्यांना सांगतो की, भुजबळ मराठ्यांना जाणून बुजून त्रास द्यायला लावेल. तुम्ही मराठ्यांना त्रास होऊ देऊ नका. त्यांना वडीगोद्रीतच दंगल घडवून आणायची होती पण मी त्यांचा डाव उधळून लावला, असंही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wai Fort : कातळात कोरलेल्या पायऱ्या अन् भव्य डोंगररांग; वाईजवळ लपलाय खतरनाक किल्ला, चढाई पाहूनच उडेल धडकी

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून 'वॉर रूम'ची निर्मिती होणार

ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; सामाजिक क्षेत्रात खळबळ

Marathi Actor : मराठमोळा अभिनेता लग्नाच्या ८ वर्षांनी झाला बाबा, PHOTO शेअर करत दाखवली मुलांची झलक

Weather Update: राज्यात ऊन-पावसाचा खेळ, ६ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; आज कुठे कसं राहिल हवामान?

SCROLL FOR NEXT