Manoj Jarange Patil Mumbai march date September 2026 saam tv
महाराष्ट्र

परवानगी दिली नाही तरी मुंबईला जाणारच, जरांगेंचा निर्धार, आंदोलक मुंबईत धडकणार

Maratha Reservation Stir: अंतरवालीत 14 दिवस उपोषण करूनही जरांगेंच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत...त्यामुळे आता जरांगेनी मुंबईत धडक देण्याचं जाहीर केलंय. त्यासाठी उद्या बैठक बोलावलीय. या बैठकीत काय होणार? जरांगे कधी मुंबईत जाणार? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मराठा आरक्षणासाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलाय...जरांगे पाटलांच्या अंतरवालीतील उपोषणाला 14 दिवस पूर्ण होऊनही मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे परवानगी मिळो ना मिळो मुंबईत आंदोलन करणारच अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतलीय. 12 सप्टेंबरला जालन्यातील अंतरवाली सराटीत, मराठा आंदोलकाची एक राज्यस्तरीय बैठक होणार असून याच बैठकीत मुंबईतल्या मराठा आंदोलनाची तारीख ठरणार आहे.

दरम्यान राज्यातील मराठा बांधवांना मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जरांगेंनी केलय..त्यातच मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मराठ्यांनी प्लॅन बी ही तयार केलाय...

मुंबईतील आंदोलनात मराठ्यांना त्रास झाला तर गप्प बसू नका. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मराठ्यांनी एकत्र येऊन शांततेत ठिय्या मांडून बसा.

शेतीची काम असल्यास आणि आर्थिक अडचणींमुळे मुंबईला येणे शक्य नसलेल्यांनी गावातूनच आरक्षणाच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा द्यावा.

मुंबईला जाणाऱ्या आंदोलकांसाठी गावकऱ्यांनी वर्गणी काढून वाहनांची आणि जेवणाची व्यवस्था करावी.

ज्यांना मुंबईला येणं शक्य नाही त्यांनी मराठा आंदोलनाच्या मार्गावर सहकुटुंब उपस्थित राहावं, असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलय.

दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे हिंदूंच्या सणात अडथळा आणणार नाही, असं टोला मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लगावलाय. गेल्या वर्षीप्रमाणेच ऐन गणेशोत्सवात जरांगेंनी मुंबईत आंदोलनाची रणनीती आखलीय. गेल्यावेळी मराठा आंदोलकांनी मोठ्या संख्येनं मुंबईत धडक दिली होती. त्याचीच पुनरावृती यावेळी झाली तर सरकारची मोठी कसोटी लागणार आहे. त्यामुळे जरांगे आंतरवाली सराटी सोडण्यापूर्वी सरकार काही निर्णायक हालचाली करणार की थेट मुंबईतच जरांगे आणि सरकारमधील संघर्ष पाहायला मिळणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागंलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT