Manoj Jarange Patil solo march to Mumbai saam tv
महाराष्ट्र

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

Jarange Patil Changes Mumbai Protest Strategy: सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यानं जरांगे उपोषणावर कायम आहेत... अशातच मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावर जरांगेंनी मास्टर प्लॅन आखलाय...

Suprim Maskar

गेल्या 17 दिवसांपासून जरांगे पाटील अंतरवालीत उपोषणाला बसलेत...अशातच सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस भूमिका न घेतल्यानं जरांगेंनी हजारो मराठा आंदोलकांसह 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला होता. मात्र मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांंदा परवानगी नाकारल्यामुळे जरांगेंनी आपली रणनीती बदललीय. जरांगेंनी आता एकटेच मुंबई गाठण्याचा निर्धार केलाय.. इतकचं नव्हे तर सरकाराला प्रतिआव्हानंही दिलयं....

दुसरीकडे जरांगेंच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात त्यामुळे त्यांनी गणेशोत्सव काळात आंदोलन करणं योग्य नाही असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलीय.. त्यालाच जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांवर पलटवार केलाय...

दरम्यान पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आणि सरकारच्या दबाबामुळे जरांगेंनी काय रणनीती आखलीय...पाहूयात.

जरांगे एकटेच मुंबईच्या दिशेने निघणार

प्रवासात त्यांच्यासोबत जास्तीत जास्त 1 ते 2 गाड्या आणि आपत्कालीन वापरासाठी 2रुग्णवाहिका असतील.

5 ते 10 पेक्षा जास्त माणसे जरांगेंसोबत नसतील

मराठ्यांनी मुंबईला कधी पोहचायचं यासंदर्भात सूचना जरांगे मुंबईत पोहचल्यानंतर देतील

मुंबई पोलिसांनी सुरक्षेचं कारण पुढे करत

जरांगेंना आंदोलनाची परवानगी नाकारली असली

तरी पोलिसांनी निर्णयाचा फेरविचार करावा, असा अर्ज मराठा आंदोलकांनी पोलिसांना दिला... मात्र तो अर्जही पोलिसांनी नाकारल्यानं आता जरांगे एकटेच मुंबईत आंदोलनासाठी येणार, हे जवळपास निश्चित आहे...कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून जरांगेंनी हा निर्णय घेतला असला तरी मराठा समाज जरांगेंच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की कुटनितीचा अवलंब करत मराठेही जरांगेंपाठोपाठ मुंबई गाठणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

ठाकरे रात्री १२ वाजता कुठे जायचे? सकाळी ६ वाजता परतायचे; बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT