Manoj Jarange Patil Maratha Reservation SaamTV
महाराष्ट्र

मराठा आरक्षण दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लान? मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, एका मंत्र्याने...

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभं करणार आहे. त्या आंदोलनात दोन मंत्री असणार आहेत. १२ ते १३ दिवस आमरण उपोषण करणार आहेत. त्यातील एक मंत्र्यांनी मला ही माहिती दिली.

Prashant Patil

धाराशिव : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आणणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. त्यांचं आंदोलन दडपण्यासाठी सरकार स्वत:चं आंदोलन उभं करणार आहे. सरकारचे दोन मंत्री त्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची चर्चा झाल्याची माहिती एक मंत्र्याने आपणास दिल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभं करणार आहे. त्या आंदोलनात दोन मंत्री असणार आहेत. १२ ते १३ दिवस आमरण उपोषण करणार आहेत. त्यातील एक मंत्र्यांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर १४ दिवसानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस आरक्षणाचा मार्ग काढतील. हैद्राबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, तिन्ही गॅझेट मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस लागू करतील अशी मला आशा आहे. शिंदे समितीकडे सात महिन्यांपासून गॅजेटचा विषय आहे. त्यामुळे त्याबाबत अभ्यास झाला आहे. १५ दिवसात सगळा अभ्यास होतो, असं जरांगे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT