Manoj Jarange Patil  Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल असं जरांगेंनी म्हटलं आहे.

Sandeep Gawade

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल असं जरांगेंनी म्हटलं आहे. 21 ते 24 तारीख पर्यंत दौरा आहे त्यामुळे मी रुग्णालयातून सुट्टी घेतलेली आहे आणि चार जूनला आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी केला आहे.

आम्हाला लोकसभेच्या गुलालात पळायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे. तो गुलाल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आमची लेकरं मोठी झाली तर त्यांचं कल्याण होईल. त्यामुळे आमच्या न्यायासाठी आम्ही अंतरवालीत एकवटणार आहोत. मराठा आणि कुणबी एकच आहे, सगेसोयरे अंमलबजावणी करावी हैदराबादचा गॅझेट लागू करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जूनपर्यंत आरक्षण द्यावं, अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT