Manoj Jarange Patil Hunger Strike News Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; आज कोणकोणते जिल्हे बंद? पाहा VIDEO

Manoj Jarange Patil Hunger Strike News : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे.

Satish Daud

सगेसोयरेचा अध्यादेश आणि हैदराबाद गॅझेट लागू करा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज रविवारी (ता २२) त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. शनिवारी उपचार घेतले असले तरी जरांगे यांची प्रकृती खालवत चालली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाकडून आज पुणे, सोलापूर, परभणी, लातूर आणि जालना बंदची हाक देण्यात आली आहे. परभणी आज सकाळपासूनच जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील सर्व दुकाने बंद असून बाजारात शुकशुकाट आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसाचा चोख बंदोबस्त जिल्हाभरात तैनात करण्यात आला आहे.

या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातही आज बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला सकाळपासून नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. बंदमधून जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था दळणवळण, तसेच जिल्ह्यातील अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली असून या बंदला मराठा बांधवांनी पाठिंबा दिला आहे.

दुसरीकडे वडीगोद्री फाटा येथे पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसांनी वडीगोद्री ते अंतरवाली सराटी जाणारा मुख्य रस्ता बंद केला असून अंतरवाली सराटीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून देखील बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला हिंसक वळण लागू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज मराठा बांधव बीडमध्ये आंदोलन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT