Manoj Jarange Patil  Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा, काय आहे नेमकं प्रकरण?

Manoj Jarange Latest News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि विना परवानगी सभा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आहे.

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, नांदेड

Manoj Jarange News :

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि विना परवानगी सभा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आहे. मनोज जरांगे यांच्याविरोधात सोमवारी रात्री उशिरा नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांच्या विरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री उशिरा मनोज जरांगे यांची नांदेड मधील एका मंगल कार्यालयात सभा झाली . मात्र या सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. या शिवाय नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तारखेपर्यंत जिल्ह्यात जमाव बंदी आहे. तसेच आंदोलन , उपोषण, रास्ता रोको करण्यास बंदी घातली होती.

मनोज जरांगे पाटील यांनी विना परवानगी सभा घेऊन जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केले. तसंच रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपण सूरु ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि श्याम वडजे यांच्या विरोधात कलम 188 , 135 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नांदेड पोलीस अधीक्षक काय म्हणाले?

'नांदेडच्या भाग्यनगर पोलीस स्टेशन परिसरात रात्री दहा वाजल्यानंतर मनोज जरांगे यांची सभा सुरु होती. या सभेच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. यामुळे भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी कलम १८८ आणि १३५ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती नांदेड पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

मनोज जरांगेंचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सगेसोरऱ्याची अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली आहे. मनोज जरांगेंनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी १० मार्चपर्यंत करा, अशी मागणी केली आहे. तसेच 2012 च्या कायद्यात दुरुस्ती करून आचारसंहिता लागण्यापूर्वी अंमलबजावणी आधी करावी, अशीही मागणी जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर राज्य सरकार काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाला सुरुवात, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारंबळ

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

Plain Saree Styling Tips: प्लेन साडीमध्ये दिसाल एकदम स्टायलिश, या 5 फॅशन टिप्स करा फॉलो

Electricity Bill Mumbai: विज बील होणार स्वस्त, ग्राहकांसाठी नवे दर काय असतील?

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचं तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT