Manoj Jarange Patil On Dhangar Reservation 
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: धनगर बांधवांनो! आत्महत्या करू नका, मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेऊ;मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धनगर आरक्षणावरुन गंभीर इशारा दिलाय. तसेच त्यांनी धनगर बांधवांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलंय.

Bharat Jadhav

मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे पाटील आता धनगर आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करताना त्यांनी सरकार गंभीर इशारा दिलाय. तसेच आरक्षणासाठी जीव देणाऱ्या धनगर बांधवांना त्यांनी आत्महत्या न करण्याचं आवाहन केलंय.

माझी सगळ्या धनगर बांधवांना विनंती आहे, यांच्या बापाला एसटीतून आरक्षण द्यावे लागणार आहे, आत्महत्या करू नका. सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेऊ, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.

धनगर आरक्षणाची मागणी करताना मनोज जरांगे यांनी धनगर बांधवांना आवाहन केले आहे. धनगर बांधवांनी आत्महत्या करू नये. धनगर समजाच्या आरक्षणासाठी आपण त्यांच्यासाठी पाठिशी आहोत. मी तोंडापूरत बोलत नाही मी राजकारणी नाही, सरकारच्या मुडक्यावर पाय देऊन आपण आरक्षण घेऊ, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिलाय.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं तर धनगर आरक्षणाला धक्का लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर बोलतांना जरांगे पाटील म्हणाले, मराठा जरी ओबीसीत आला तरी आमच्या आरक्षणामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. धनगर बांधवांनी टोकाचं पाऊल उचलू नये, मराठा समाज तुमच्यासोबत आहे,असं आवाहनही जरांगेंनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

SCROLL FOR NEXT