Manoj Jarange Patil News Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News : कोर्टाची तारीख एका रात्रीत कशी बदलली?, जरांगेंचे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

Maratha Reservation : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर ते उपोषणस्थळावरून उठत थेट मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत.

Sandeep Gawade

Manoj Jarange Patil News

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर ते उपोषणस्थळावरून उठत थेट मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत. दरम्यान त्यांनी सायंकाळी ७ वाजता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

न्यायालयचा मान ठेऊन मी उपचार घेतले, मात्र त्या नंतर तारीख बदलली आणि फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात याचिका दाखल करायला लावली आणि 13 तारीख बदलून ती तारीख 23 केली गेली. एका रात्रीत न्यायालय तारीख कशी बदलू शकतं, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. नितेश राणे यांनी जरांगेंवर टीका केली होती. त्यांनाही जरांगेंनी खडसावलं आहे.

मी मराठा समाजाचं लेकरू आहे, मी आयुष्यभर समजासोबत गद्दारी करणार नाही. मी निष्ठावंत आहे म्हणून मला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. 16 दिवसापासून मी उपोषण करतोय मात्र आंदोलन फोडण्याचं कारस्थान सुरू आहे. 10 टक्के आरक्षण दिल्यावर त्यांना वाटलं होतं की जल्लोष होईलमात्र आम्ही ओबीसीतून आरक्षण मागीतल्यामुळे यांना राग आला, असा आरोप त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभू्मीवर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांकडून जालना आणि छत्रपती संभाजीनगर सीमा भागात बॅरिकेट लावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईच्या दिशेने जाण्याच्या निर्णयानंतर पोलीस यंत्रणा सजग झाली आहे. मनोज जरांगे हे पैठण-बीडकिन-गंगापूर-वैजापूर-येवला-नाशिक-ठाणे या मार्गावरून जाणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT