Manoj Jarange patil Viral Audio Clip  AI Image
महाराष्ट्र

Breaking News : मनोज जरांगेंनी टाकला मोठा ऑडिओ बॉम्ब, ५०० कोटींच्या आरोपांचा थेट पुरावाच दाखवला

Manoj Jarange On 500 Crore Eknath Shinde News : मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या कथित व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. एकनाथ शिंदे यांनी आरोप फेटाळले असून, या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्राच्या राजकारणात 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून नवा वाद

  • मनोज जरांगे पाटील यांना श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पैसे दिल्याच्या चर्चेचा दावा

  • एकनाथ शिंदे यांनी आरोप फेटाळून लावत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले

  • जरांगे पाटील यांनी या प्रकरणाशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांसमोर आणली

  • कथित क्लिपमध्ये दोन महिलांमधील संभाषण असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून नवा वाद निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले, अशी भाजपमध्ये कुजबूज सुरु आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला. या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मनोज जरांगे यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. आपण कोणालाही 500 कोटी रुपये दिले नाहीत आणि कोणाकडून घेतलेही नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसेच, जरांगे यांनी आपल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत, असे आव्हानही शिंदे यांनी दिले होते. यानंतर मनोज जरांगे यांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावा देणार असल्याचे सांगितले होते. आपल्याकडे एक ऑडिओ क्लिप असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता ही कथित ऑडिओ क्लिप त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आणली आहे. ही क्लिप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या एका ऑनलाइन मिटिंगमध्ये झालेल्या चर्चेची असल्याचे सांगितले जात आहे.

या रेकॉर्डिंगमध्ये दोन महिलांमध्ये हिंदी भाषेत संवाद झाल्याचे ऐकू येते. त्यापैकी एक महिला बोलताना जरांगे पाटील यांना आधीच 500 कोटी रुपये मिळाल्याचा दावा करते. हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दिल्याचेही ती महिला संभाषणात सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत जरांगे यांची भूमिका भाजपसाठी किती फायदेशीर ठरेल, याबाबत आपले मत वेगळे असल्याचे ती म्हणते.

दरम्यान, या ऑडिओ क्लिपमधील आवाज कोणाचा आहे, संभाषण नेमके कधी झाले आणि त्यातील दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, याची पुष्टी साम टीव्ही करत नाही. दरम्यान मनोज जरांगे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. आता एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतायत याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा विश्वास

Camphor Bath Benefits: कापूरच्या पाण्याने आंघोळ करण्याचे 5 जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Pune Accident : भीषण अपघात! मतदान केंद्रावर बूथ प्रतिनिधीला घेऊन जाणारी कार विद्यार्थ्यांना धडकली; एका मुलीचा मृत्यू

Cleaning Tips : दारा-खिडक्यांच्या लोखंडी जाळीवरील घाण आणि चिकटपणा मिनिटांत साफ करण्याची सोपी ट्रिक, जाणून घ्या

Belly Fat Loss : चाळिशीनंतर वाढतंय पोट? चरबी कमी करण्यासाठी रोज १५ मिनिटे करा 'ही' ३ कामे

SCROLL FOR NEXT