Manoj Jarange Patil 500 crore allegation latest news saam tv
महाराष्ट्र

500 कोटींचा आरोप, जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब; मराठा आंदोलन मोडून काढण्याचा कट कुणाचा?

₹500 Crore Allegation Against Eknath Shinde: जरांगेंनी 500 कोटींच्या आरोपानंतर ऑडिओ बॉम्बद्वारे नवा पुरावा समोर आणलाय...त्यामुळे मराठा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न कुणी केला? 500 कोटींच्या आरोपात नेमकं कुणाचं नाव समोर आलयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

जरांगेच्या या ऑडीओ क्लीपनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिलीय..आंदोलन थांबवण्यासाठी शिंदेनी ५०० कोटी भाजपकडून घेतल्याच्या गंभीर आरोप दसरा मेळाव्याला नारायणगडावरून जरांगेंनी केला आणि त्यानंतर पुरावा म्हणून पत्रकार परिषदेत तब्बल अर्ध्या तासाची ऑडीओ क्लीप ऐकवली...

ही क्लीप एकेवून जरांगे थांबले नाहीत तर ही क्लीप भाजपच्या ITसेलच्या बैठकीतील असल्याचा दावाही जरांगेंनी केलाय... मराठी आंदोलन मोडून काढण्यासाठीच्या या 500 कोटींच्या षडयंत्राची पंतप्रधान मोदींनी दखल घ्यावी अशी मागणीही जरांगे पाटलांनी केलीय... दुसरीकडे जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बनंतर शिंदेसेनेनं थेट भाजपकडे बोटं दाखवलयं....2 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आता कशी बाहेर आली?

क्लिपमधील लोक भाजपचेच आहेत, असं म्हणत रामदास कदमांनी भाजवर निशाणा साधलाय... तर शिंदेंच्या बदनामीची सुपारी कोणी दिली? याची चौकशी व्हायला हवी, असं विधान मंत्री संजय शिरसाटांनी केलयं...मात्र AIच्या माध्यमातून नेत्यांची बनावट क्लिप बनवता येते... त्यामुळे चौकशीनंतरच तो आवाज भाजपच्या लोकांचा आहे की नाही ते स्पष्ट होईल, असं प्रत्युत्तर भाजपनं दिलयं...

नारायण गडावरील दसरा मेळाव्यात सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा हा कलगीतुरा आता ऑडिओ क्लिपच्या पुराव्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. एकीकडे जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय... तर दुसरीकडे शिंदेसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आलीय.... जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बनंतर या प्रकरणाची STI चौकशी होणार का? SIT चौकशीत कोणती तथ्य समोर येणार? जरांगेंचं आंदोलन संपवण्यासाठी हा डाव आखला गेलाय की आरोपांआडून शिंदेसेनेची बदनामी सुरु आहे? हे सर्व चौकशीनंतर समोर येईलच पण तोपर्यंत ऑडीओ क्लीपचा बॉम्ब किती धमाका उडवणार पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Risk : तुम्ही रात्री किती वाजता जेवता? वेळ चुकली तर कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक माहिती

How Long Should Walk Daily: फिट राहण्यासाठी रोज किती वेळ चालावं? ३० मिनिटे, ४५ मिनिटे की १ तास; जाणून घ्या फायदे

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेनेचा दिवाळीचा शिधा परभणीत दाखल

भीषण अपघात! भरधाव मिनी बस झाडाला धडकली; 6 जणांचा जागीच मृत्यू, 39 प्रवासी जखमी

GST नियमांमध्ये होणार मोठे बदल; व्यापाऱ्यांना दिलासा, रिफंडही मिळणार लवकर

SCROLL FOR NEXT