Manoj Jarange warning to Eknath Shinde over Parbhani farmer meet saam tv
महाराष्ट्र

शिंदेंचा कार्यक्रम घेतला तर धिंगाणा होईल; जरांगेंचा शिंदेसेनेच्या खासदाराला थेट इशारा

Maratha Reservation Row: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण पुकारलंय. मात्र, यावेळी जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात दुसऱ्यांदा आक्रमक भूमिका घेतलीये. जरांगे शिंदेंविरोधात आक्रमक का झालेत?... पाहूयात या रिपोर्टमधून...

Rohit Kadam

परभणीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. पण या कार्यक्रमाला मनोज जरांगेंनी विरोध केलाय. त्यामुळे कार्यक्रमावरून शिंदेसेनेचे खासदार संजय जाधव आणि मनोज जरांगे यांच्यात खडाजंगी रंगली... कार्यक्रम रद्द न झाल्यास दंगल घडेल, असा थेट इशाराच त्यांनी खासदार संजय जाधवांना दिला... तर दुसरीकडे, काहीही झालं तरी कार्यक्रम होणारच, अशी ठाम भूमिका खासदार जाधवांनी घेतली... यावर जरांगेंनीही पलटवार केला...

शेतकरी मेळावा रद्द करण्याचा मनोज जरांगेंनी इशारा दिल्यानंतर मराठा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.. परभणी आणि नांदेडमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली...

मात्र मराठा समाजाच्या विरोधानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सरकार करतं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं...

मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींच्या कुणबी नोंदी अवैध ठरवल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा डबल गेम केल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा मेळाव्याच्या निमित्तानं जरांगेंनी शिंदेसेनेला टार्गेट केलंय. मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींच्या अंमलबजावणीसाठी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना आता, जरांगेंनी परभणीतील मेळाव्यावरून एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. एव्हंढच नाही तर शिंदेंच्या नियोजित कार्यक्रमस्थळी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजीही केलीये. त्यामुळे आता परभणीतील शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं एकनाथ शिंदे पुन्हा एकदा जरांगेंच्या रडारवर येण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT