पंढरपूर : करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे अटकेत असलेला भोंदूबाबा मनोहर भोसले Manohar Bhosale आजारी असल्याने त्याच्यावरती सोलापूरातमधील Solapur रूग्णालयामध्ये Hospital उपचार सुरू आहेत. त्यामुळे करमाळा पोलिसांनी Karmala Police वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सोमवारी मनोहर भोसले याला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यानुसार भोसलेला न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांनी तुर्त न्यायालयीन कोठडी दिली आहे. (Manohar Bhosle now in judicial custod)
हे देखील पहा -
महिलेवरील बलात्कार प्रकरणात भोंदूबाबा मनोहर भोसलेला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बारामती पोलिसातही गुन्हा दाखल आहे. तेथून त्याला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. 20 सप्टेंबरला करमाळा न्यायालयात हजर केले तेव्हा करमाळा न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी Police custody मंजूर केली होती. तेव्हा पोलिसांनी 10 दिवसाची पोलिस कोठडी मागितली होती. आज पोलिस कोठडी संपत होती. दरम्यान भोसले यास त्रास होवू लागल्याने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर सोलापूर येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
आज त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तपासणी अधिकारी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी भोसलेवर उपचार सुरू असल्याचे पेपर दाखल करत तुर्त न्यायालयीन कोठडीची Judicial custody मागणी केली. उपचार संपल्यावर पुन्हा पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. दरम्यान पोलिसांच्या अहवालानुसार न्यायाधीश शिवरात्री Judge Shivratri यांनी भोसलेला तुर्त न्यायालयीन कोठडी दिली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.