Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Onion Price: कांद्याचे भाव गडगडले; सरासरी ९२५ रुपये दर

कांद्याचे भाव गडगडले; सरासरी ९२५ रुपये दर

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : कांदा काढणीला सुरवात झाली आहे. यामुळे मार्केटमध्‍ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे (Onion) कांद्याचे भाव गडगडले आहेत. भाव कमी झाल्‍याने शेतकरी (Farmer) हवालदील झाला आहे. (Letest Marathi News)

देशांतर्गत असलेल्या पटना, सिल्लीगुडी, बिहार आदींसह स्थानिक बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक वाढल्याने भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कांद्याचे भाव कमी झाल्याने उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्यानेच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तिनशे रूपयांनी घसरले दर

देशांतर्गत कांद्याचे भाव घसरल्याने व स्थानिक बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक वाढली आहे. यामुळे सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी प्रती क्विंटल ३०० रुपयांनी कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील सप्ताहात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल १२५० रुपये भाव होता. आज मात्र क्विंटलला ९२५ रुपये इतका सरासरी भाव मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat: पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुम्हाला...; मंत्री शिरसाटांचं नवं विधान; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update :परतवाडा-चिखलदरा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी

Monsoon Kitchen Tips: पावसाळ्यात पापड कुरकुरीत ठेवायचे? असे करा स्टोअर

Kota Srinivasa Rao Death : सिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, तीन दिवसांपूर्वी साजरा केला वाढदिवस

Crime: बीड नव्हे तर बिहार! निवृत्त पोलिसाला डांबून ठेवलं, २ तास अमानुष मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

SCROLL FOR NEXT