Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime News: विमा एजंट बनून आला अन् महिलेच्या घरात शिरला; मारहाण करत सोन्याचे दागिने, मोबाइल घेऊन फरार, परिसरात खळबळ

nanded crime news: नांदेडमध्ये विमा एजंट बनून महिलेच्या घरात घुसून चोरी केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Nanded Crime News:

नांदेडमध्ये एका व्यक्तीने विमा एजंट बनून महिलेच्या घरात घुसून चोरी केल्याची घटना घडली आहे. विमा एजंट बनून एका व्यक्तीने घरात घुसून महिलेला मारहाण करत मौलव्यान वस्तू चोरी केल्याची घटना घडली आहे. नांदेडच्या व्यंटकेश नगर परिसरात ही चोरीची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, विमा एजंट बनून आलेल्या एका व्यक्तीने घरात घुसून महिलेला मारहाण केली. त्यानंतर मौल्यवान वस्तू चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. मंगळवारी भर दुपारी नांदेडच्या डीमार्ट परिसरातील व्यंकटेश नगर येथे ही चोरीची घटना घडली.

चोराच्या हल्ल्यात ही महिला जखमी झाली आहे. शुभांगी दोडके असं या जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या व्यंकटेश नगरमध्ये राहणाऱ्या शुंभागी दोडके या घरात एकट्या होत्या. मंगळवारी दुपारी सवा वाजण्याच्या सुमारास अनोळखी माणूस विमा एजंट बनून व्यंकटेशन नगरमध्ये फिरत होता. त्याने परिसरात जाधव यांचं घर कुठं आहे , अशी विचारणा केली. त्यानंतर या व्यक्तीने शुभांगी दोडगे यांच्या घराचा दरवाजा ठोठावला.

दरवाजा उघडल्यानंतर या व्यक्तीने महिलेला धक्का दिला. त्यानंतर घराची आतून कडी लावली. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवाण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने त्याचा विरोध केला.

महिला विरोध करत असताना या व्यक्तीने त्याच्या जवळील वस्तूने महिलेच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात ही महिला जखमी झाली. यानंतर या व्यक्तीने घरातील सोने आणि मोबाइल घेऊन पसार झाला.

या घटनेनंतर महिलेने घराबाहेर येऊन शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेच्या तक्रारीनंतर भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. अज्ञात व्यक्ती परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होणार, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करणार

Gas Shortage Impact: गॅसची तूट, रिक्षाचालकांकडून लूट; नाशिक, कोल्हापूरात 10 रुपयांची वाढ

Success Story: लहानपणी KBC मध्ये १ कोटी जिंकले, MBBS केलं, नंतर क्रॅक केली UPSC; IPS रवि मोहन सैनी यांचा प्रवास

Friday Horoscope: आजच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT