चंद्रपूर - बसने कुत्र्याला उडवल्यावर लाडक्या कुत्र्याच्या मृत्यूसाठी तीन लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. चंद्रपूर शहरतल्या तुकूम परिसरातील ही घटना घडली आहे. उमेश भटकर असे मालकाचे तर 'जॉन' कुत्र्याचे नाव आहे. तुकुम येथील रहिवासी उमेश भटकर हे १० जानेवारी २०१३ ला सकाळी आपल्या ११ महिन्यांच्या लाडक्या कुत्र्याला अय्यप्पा मंदिराजवळ फिरवत होते.
हे देखील पहा -
त्यावेळी एका भरधाव स्कुल बसने त्यांच्या कुत्र्याला धडक दिली. ज्यामध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला. हा कुत्रा भटकर कुटुंबाचा लाडका कुत्रा होता.आपले दुःख बाजूला ठेवत लाडक्या कुत्र्याला न्याय मिळवून देण्याचे त्यांनी ठरवले आणि एक, दोन नव्हे तर तब्बल ८ वर्षे न्यायालयीन लढाई लढली.
अपघाताला दोषी असलेला बसचालक आणि इन्शुरन्स कंपनीकडून ३ लाख रुपये भरपाई मिळवली. अपघातातील आरोपीने कुत्र्याच्या मालकाला एकूण ३ लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. अंसारी यांनी दिला आहे. बसचालकांना वेगाविषयी अद्दल घडावी यासाठी हा संघर्ष केल्याची भावना भटकर यांनी व्यक्त केली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.