Dharashiv News  Saam TV
महाराष्ट्र

Dharashiv News : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने जीवन संपवलं, धारशिवमधील घटनेने हळहळ

Crime News : प्रवीण घोडके असे या तरुणाचे नाव असून बुधवारी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली.

प्रविण वाकचौरे

Dharashiv News :

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणखी एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भुम तालुक्यातील निपाणी येथील 38 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं आहे.

प्रवीण घोडके असे या तरुणाचे नाव असून बुधवारी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठीच आत्महात्या केल्याची माहिती मयत प्रवीणचे वडील काकासाहेब घोडके यांनी दिली. मयत प्रवीण विवाहित असून त्याला एक मुलगा, दोन मुली आहेत. (Latest News)

बीडमधील शहाजानपूर लोणी गावात देखील बुधवारी एका २१ वर्षीय मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अशोक मते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अशोकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात सरकार मराठा आरक्षण देत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांपूर्वी जालन्यातील चिकनगाव मधील एका व्यक्तीने मुंबईत आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुनील बाबुराव कावळे असं या व्यक्तीचं नाव होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT