Woman veterinarian Dr. Priyal Chauragade tranquilizes the man-eating tigress from inside a cage during a high-risk forest operation in Nagpur. saam tv
महाराष्ट्र

नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद, पिंजऱ्यातूनच महिला डॉक्टरचा वाघिणीवर नेम

Nagpur Forest Team Nets Man-Eater Tigress: नागपूरच्या उमरेड वनपरीक्षेत्रात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वाघीणीला जेरबंद करण्यात यश आलंय. मात्र जंगलातल्या वाघीणीला पकडण्यासाठी वनविभागाची एक वाघीण पुढे सरसावली होती. कोण आहे ही वनखात्याची वाघीण? कसं केलं तिनं नरभक्षक वाघिणीला जेरबंद? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट...

Girish Nikam

हा पिंजरा निट बघा...जंगलात लावलेला हा पिंजरा एका वाघिणीच्या प्रतिक्षेत आहे. हो...सतत हुलकावणी देणाऱ्या एका नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वन विभाग पूर्णपणे सज्ज आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल पिंजऱ्यामध्ये डार्ट गन घेऊन कोण बसलंय ? 2 बळी घेणाऱ्या वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने एक थरारक युक्ती वापरलीय. चक्क या पिंजऱ्यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे आणि त्यांचे सहकारी प्रतीक घाटे बसले. त्यांनी काही काळ वाघिणीची प्रतीक्षा केली. आणी अखेर तो निर्णायक क्षण आला. वाघीण समोर येताच डॉ. प्रियल यांनी एका क्षणात अचूक डार्ट मारत वाघिणीला बेशुद्ध केलं. वाघीणीला बेशुद्ध करणाऱ्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आहेत.

अवघ्या 15 मिनिटांत वाघीण बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला त्याच पिंजऱ्यातून नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले. वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. तसेच दोन ठिकाणी भक्ष्य बांधण्यात आले होते. मात्र, त्या भक्ष्याकडे न जाता वाघिणीने मोकाट जनावराची शिकार केली आणि ते जंगलात ओढून नेले होते.

पुणे आणि नाशिकमध्ये बिबट्याची दहशत असतानाच नागपूर जिल्ह्यातील उमरेड वनपरिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून सुमारे अडीच ते तीन वर्षांच्या वाघिणीने धुमाकूळ घातला होता. वाघिणीच्या हल्ल्यात 27 मार्चला निर्मला गभणे आणि 6 जूनला दिगंबर पाटील यांचा बळी गेला. हे दोघेही शेतात काम करत होते. यानंतर दोन ते तीन जणांना वाघीणीने जखमी केले होते. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले होते.

पिंजऱ्यातून दिसणारे दृश्य मर्यादित असल्याने नेम साधणे आव्हानात्मक होते. मात्र, योग्य संधी मिळताच डॉ. प्रियल चौरागडे यांनी अचूक नेम साधला. दोन जणांचा बळी घेतलेल्या आणि अनेक दिवसांपासून वनविभागाला हुलकावणी देणाऱ्या वाघिणीला अखेर वनखात्याच्या वाघिणीनंच जेरबंद केल्यामुळे सर्वत्र कौतुक होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालखीत वारक-यांना लुटणारे चोरकरी, पुण्यात वारीत चोरी, धास्तावले वारकरी, खाज-खुजली टाकून लुटणारी टोळी

एकापेक्षा अधिक लग्न केल्यास सरकारी नोकरी जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ऑपरेशन टायगर 4.0 लवकर होणार? नाशिकमध्ये ठाकरेंचे 12 नगरसेवक फुटणार?

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT