Buldhana Saam
महाराष्ट्र

Buldhana News: "माझी पत्नी आणून द्या"; बायको माहेरी गेली, नवऱ्याची सटकी, पठ्ठ्यानं एसटीच्या काचाच फोडल्या

Shocking Incident in Buldhana: पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून संतप्त व्यक्तीने एसटी बसच्या काचा फोडून पोलिसांकडे पत्नीला परत आणण्याची मागणी केली आहे.

Bhagyashree Kamble

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात एक अजब प्रकार घडला आहे. पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून एका व्यक्तीने एसटीच्या काचा फोडल्या आहेत. माथेफिरूची पत्नी जवळपास पंधरा वर्षांपूर्वी त्याला सोडून माहेरी गेली होती. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने अनेकदा पोलिसांकडे निवेदनही दिले. मात्र, बायको काही सासरी आली नाही. अखेर आज संतापलेल्या व्यक्तीने एसटीच्या काचा फोडत पोलीस प्रशासनाकडे आपली पत्नी परत आणवी, अशी विनंती केली.

प्रकाश पिंजरकर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीचे पत्नीशी भांडण झाले होते. कडाक्याचे भांडण झाल्यानंतर ही महिला माहेरी निघून गेली. १५ वर्षांपूर्वीच महिला माहेरी निघून गेल्याची माहिती आहे. प्रकाशने अनेकदा पोलिसांकडे निवेदन दिले होते. पण पत्नी काही घरी परत आली नाही. अखेर आज प्रकाशचा संताप अनावर झाला.

प्रकाशने संतापाच्या भरात एसटीच्या काचा फोडल्या. शेगाव - वानखेड या बसच्या मागच्या काचा फोडल्या आणि बसचे नुकसाने केले. तसेच पोलीस प्रशासनाने पत्नीला परत आणावी अशी विनंती केली. सध्या ही बस वानखेड गावात थांबली असून, पोलीस अद्याप घटनास्थळी पोहोचलेले नाही.

या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्षा लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणातील कपिल दहिया आणि संजय कुमार शर्मा यांना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Kamali Serial: कमळीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं सत्य येणार समोर; पण, कामिनी रचणार विषाचा कट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ८ दिवसात ₹१५०० जमा होणार? जूनच्या हप्त्याची अपडेट आली समोर

पुढील ७ दिवस राज्यात पावसाची "सुट्टी", मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात "नो अलर्ट"

Sperm count: स्पर्म काऊंट म्हणजे काय? तो किती असणं मानलं जातं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT