गणपती विसर्जन वेळी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला अटक... Saam Tv
महाराष्ट्र

Jalna : गणपती विसर्जन वेळी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला अटक...

माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केले.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - शहरातील गणपती विसर्जन सुरू असताना लक्ष्मीनारायनपुरा जुना जालना Jalna परिरातून गावठी पिस्टल सोबत बाळगणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाला जालन्याच्या कदीम जालना पोलिसांनी Jalna Police अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्टल Gun जप्त केली आहे. एक तरुण पांढऱ्या रंगाचे कपडे घालून गणपती विसर्जन उत्सवाच्या दरम्यान लक्ष्मीनारायणपुरा जुना जालना परिसरात कमरेला गावठी पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती.

हे देखील पहा -

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शहरातील लक्ष्मीनारायणपुरा जुना जालना परिसरातील गल्लीतून जाणाऱ्या या तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला मागील बाजूस पॅण्टमध्ये एक गावठी पिस्तुल सह मॅगझीनआढळून आल्याने आरोपीला जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी पिस्टल बाबद विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखिलेश बालाजी तल्ला रा.लक्ष्मीनारायणपुरा जुना जालना विरोधात कदीम जालना पोलिसांत गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT