Malin News Saam tv
महाराष्ट्र

Malin News : शाळेत मुलांवर शिक्षकाकडुन घृणास्पद कृत्य; मारहाण करत मिरची खायला लावली

Malin Zp School News : शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात असतात. मात्र काही शिक्षक हे शाळेत काहीही कामे करायला लावत असतात. तर काही शिक्षक विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे प्रकार देखील घडत असतात.

रोहिदास गाडगे

माळीण : शाळेत गेलेल्या मुलांबाबत शिक्षकाकडून घृणास्पद कृत्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्याला मारहाण करत तिखट मिरची खायला लावल्या. इतकेच नाही तर शाळेतून देण्यात आलेल्या पोषण आहाराचा भात त्याच्या दप्तरात टाकुन मुलांच्या डोक्यावर तंबाखू टाकली. हा सर्व प्रकार माळीणच्या जिल्हा परिषद शाळेत घडला आहे. दरम्यान तक्रार करुनही शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. 

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात असतात. मात्र काही शिक्षक हे शाळेत काहीही कामे करायला लावत असतात. तर काही शिक्षक विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे प्रकार देखील घडत असतात. असाच काहीसा प्रकार माळीण येथील जिल्हा परिषद शाळेत घडला आहे. येथील शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण करत मिरची देखील खायला लावली आहे. 

माळीण दुर्घटनेत अनेकांनी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र त्यातुन बचावलेली कुटुंब उभारी घेत असताना शिक्षणाच्या ज्ञान मंदिरात चिमुकल्या मुलांना शिक्षक राहुल हिवरे याने मारहाण करत स्वतः वडापाव खावुन शिल्लक राहिलेल्या तिकिट मिरची मुलांना खायला लावली. हा प्रकार इथच न थांबता पोषण आहारात मिळालेला भात मुलीच्या दप्तरात टाकला. तर तंबाखु मुलांच्या डोक्यावर टाकण्याचे कृत्य शिक्षक राहुल हिवरे केले. 

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष 

दरम्यान वर्गात घडलेल्या या सर्व प्रकाराबाबत विद्यार्थी सांगत आहे. मुलांनी घरी देखील या प्रकाराबाबत सांगितले. या प्रकरणी शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांबाबत केलेल्या कृत्याबाबत शिक्षकाला शिक्षण विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप माळीणचे सरपंच रघुनाथ झांजरे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT