malhari baravkar  saamtv
महाराष्ट्र

स्वप्नील पाठोपाठ मल्हारी बारावकर या MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या!

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने नैराश्याच्या गर्तेत अडकल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने नैराश्याच्या गर्तेत अडकल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. MPSC ची तयारी करणाऱ्या स्वप्नील लोणकर या दौंड तालुक्यातील केडगाव मधील विद्यार्थ्याने जुलै २०२१ मध्ये नैराश्यातून आत्महत्या केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती दौंड तालुक्यात झाली असून मल्हारी बारवकर, (रा. देऊळगाव गाडा, ता.दौंड, जि.पुणे) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

आत्महत्येपूर्वी मल्हारी बारवकर याने लिहलेल्या चिट्ठीत त्याच्या घरच्यांसाठी नमूद केले आहे कि, "मी तुम्हाला दाखवलेली स्वप्ने पूर्ण करु शकत नाही आणि तुमचे पडलेले चेहरेही पाहू शकत नाही. या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यातही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगलं जगण्याच्या सगळ्या आशा संपलेल्या आहेत."

आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मल्हारी याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यातून ही आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाटस पोलीस करत आहेत. मात्र, स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच दौंड तालुक्यातीलच असणाऱ्या व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT