Nashik Roads अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

रस्ते नीट करा अन्यथा...; नाशिक पालिका आयुक्तांचा ठेकेदारांना अल्टिमेटम

ठेकेदार, नगरसेवक आणि काही अधिकाऱ्यांच्या मिलीजुलीमुळे या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी पैसे उकळले जातात, असा आरोप नेहमीचं केला जातो.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: शहरातील अनेक भागात सध्या रस्त्यांची काम सुरू असून या रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची आणि गुणवत्तापूर्ण करा अन्यथा जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, असा थेट इशारा महापालिका आयुक्तांनी ठेकेदारांना दिलाय. (Nashik News)

दरवर्षी, शहरातील रस्त्यांच्या कामांवर महापालिकेचा कोट्यावधींचा खर्च होतो. डांबराचे किरकोळ थर टाकून रस्ते करायचे आणि पुन्हा वर्ष दोन वर्षात रस्ते खराब झाल्याचं दाखवत अस्तरीकरणाच्या नावाखाली डांबराचा मुलामा देण्याच्या नावाखाली कोट्यावधींचा खर्च, त्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी वेगळा खर्च केला जातो. ठेकेदार, नगरसेवक आणि काही अधिकाऱ्यांच्या मिलीजुलीमुळे या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी पैसे उकळले जातात, असा आरोप नेहमीचं केला जातो.

हे देखील पाहा-

मात्र, आता रस्त्यांचा दर्जा, भुयारी आणि पावसाळी गटारींची कामं, झेब्रा क्रॉसिंग, पांढरे पट्टे मारणे अशी सर्व कामं ही गुणवत्तापूर्ण आणि मानकाप्रमाणे उच्च दर्जाची झाली पाहिजेत, अन्यथा मुंबईप्रमाणेच जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, अशा इशाराच पालिका आयुक्तांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT