Prakash Ambedkar Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: 'विचारपूर्वक विधान करावं नाहीतर...'; प्रकाश आंबेडकरांचं करणी सेनेला प्रत्युत्तर

प्रकाश आंबेडकर यांनी देखील आज सकाळी विजयस्तंभाला मानवंदना दिली.

साम टिव्ही ब्युरो

Prakash Ambedkar: भीमा कोरेगाव विजयस्तंभाला आज १ जानेवारी रोजी लाखो भीम अनुयायी मानवंदना देण्यासाठी दाखल झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी देखील आज सकाळी विजयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी त्यांनी करणी सेनेने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. कोणी काय विधान करावं ते त्याने विचारपूर्वक करावं नाहीतर ते त्यांच्याच आंगलट येतं, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. (Latest Prakash Ambedkar News)

"आजचा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याचा हा लढा आहे. या देशाला हजारो वर्ष गुलामी होती आणि राजकीय गुलामी देखील होती. या भिमा कोरेगावच्या लढाईत ही गुलामी संपली. भारताच्या स्वातंत्र्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहासाला येथून सुरवात होते. हजारो लोक याला अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि आज आनंदाचा दिवस आहे असं मी मानतो.", असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल.

करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, " देश गुलाम का झाला तर ते चातुरवर्णीयांमुळे झाला. चातुरवर्णीयांमध्ये असलेला शत्रिय हा लढाऊ होता. तो हारला की देश हारला, लोक हारले, समाज हारला अशा रीतीने झालेलं आहे. त्यामुळे कोणी काय विधान करावं ते त्याने विचारपूर्वक करावं नाहीतर ते त्यांच्याच आंगलट येतं, अशी परिस्थीतीती आहे. करणी सेना यांच्या मागे कोणीच नाही हे यातून सिद्ध होतं. कोणी अभिवादन करायला येणं न येणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. "

काय म्हणाले सेंगर?

"इंग्रजांकडून लढलेल्या गद्दार भारतीयांचा शौर्यदिन या देशात कसा काय साजरा होतो? राज्याचे मुख्यमंत्री हे कसं सहन करतात? १ जानेवारी रोजी इंग्रजांविरोधात इथं जे भारतीय लढले, त्यांच्यासाठी श्रद्धांजली सभा घेणार आहोत, कारण गद्दार भारतीयांना अभिवादन करण्यासाठीचा कार्यक्रम भीमा कोरेगाव इथं घेतला जातो. ", असं वक्तव्य सेंगर यांनी केलं होतं. त्यानंतर भीमा कोरेगाव येथे येण्यास त्यांना बंदी घालण्यात आली. तसेच अनेक बौद्ध अनुयायांनी यावर सेंगर यांचा समाचार घेतला.

भीमा कोरेगाव शौर्यदिन सोहळ्याला साल २०१८ मध्ये गालबोट लावण्यात आलं होतं. येथे येणाऱ्या लाखो भीम अनुयायांवर दगडफेक करण्यात आली. असा प्रकार पुन्हा घडूनये यासाठी यंदा कोरेगाव भीमा परिसरात २४० सीसीटिव्ही कँमेरे आणि ड्रोन कँमेरातून बारीक नजर ठेवली जाणार आहे. तसेच ४५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar: सावधान! पाच राशींसाठी पुढील दिवस धोक्याचे; शुक्राच्या गोचरमुळे आयुष्यात येतील अडचणी

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

SCROLL FOR NEXT