Samruddhi Mahamarg Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: चालकाला डुलकी लागली अन् घात झाला; समृद्धी महामार्गावर ट्रक-टँकरचा भीषण अपघात

Satish Daud

Samruddhi Mahamarg Accident News

समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. गुरुवारी (२५ जानेवारी) महामार्गावर चालकाला डुलकी लागल्यामुळं भरधाव ट्र्रँव्हल्सने कंटेनरला जोरदार धडक दिली होती. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास समृद्धीवर पुन्हा मोठा अपघात झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाला डुलकी लागल्याने ट्रक अनियंत्रित होऊन समोरील टँकरवर धडकला. या भीषण अपघातात (Accident News) ट्रक चालक आणि क्लिनर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी बिबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक आणि टँकर मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चेनेज ३१०.५ जवळ ट्रक आला असता, चालकाला अचानक डुलकी लागली. त्यानंतर काही क्षणातच ट्रक समोरील टँकरवर धडकला. (Latest Marathi News)

हा अपघात इतका भीषण होता, की ट्रकच्या कँबिनचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत ट्रकमधील चालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

समृद्धी महामार्गावर ट्रँव्हल्सचा भीषण अपघात

समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरतोय आहे. नेहमीच होणाऱ्या भीषण अपघातांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव परिसरात ट्रँव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. चालकाला डुलगी लागल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT