लातूर नांदेड महामार्ग अपघात Saam Tv
महाराष्ट्र

Latur Accident : धावत्या एसटी बससमोर बाईक आल्याने भीषण अपघात, बस उलटली, बसमध्ये ४० प्रवासी

ST Bus Accident on Latur-Nanded Highway: राज्यात एसटी बसच्या अपघाताची मालिका सुरू असतानाच आज नांदेड आणि लातूर महामार्गावर एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे.

Omkar Sonawane

लातूर: लातूर – नांदेड महामार्गावर नांदगाव पाटी येथे आज सकाळी एसटी बसचा भीषण अपघात झाला. अहमदपूरवरून लातूरकडे येणारी बस उलटल्याने हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, धावत्या बससमोर अचानक दुचाकीस्वार आल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर उलटली.

या अपघातात बसमधील ४० ते ४२ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ४ ते ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही

अपघातानंतर महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT