Political Storm in Washim Ahead of Elections Saam
महाराष्ट्र

ठाकरेंचा शिंदेंना धक्का! बड्या नेत्यानं सोडली साथ, मशाल घेतली हाती

Political Storm in Washim Ahead of Elections: वाशिम जिल्ह्यात आगामी निवडणुकीच्या काळात शिवसेना शिंदे गटाला धक्का. कारंजा येथील युवा सेनेच्या वीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेत केला प्रवेश.

Bhagyashree Kamble

  • ऐन निवडणुकीच्या काळात शिंदे सेनेला खिंडार

  • शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

  • वाशिम जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. महायुती तसेच महाआघाडीतील सर्व घटक पक्षांनी कंबर कसली आहे. नुकतेच नगरपंचायत तसेच नगरपरीषदेच्या निवडणुका जाहीर कऱण्यात आले. या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला पार पडतील. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या काळात वाशिम जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडलं आहे. शिवसेना शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

वाशिम जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील युवा सेनेच्या वीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

युवा सेनेच्या २० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये शिवसेना शिंदे सेनेला धक्का बसला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा ठाकरे सेनेचे खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. शिंदे सेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाची साथ दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कारंजा येथे ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.

निवडणुकीच्या तयारीचा अंतिम टप्पा जवळ

वाशिम जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीचा अंतिम टप्पा सुरू असून, वाशिममध्ये उमेदवारांच्या हालचालींना मोठी गती मिळाली आहे. नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुरू झालेल्या स्पर्धेमुळे शहरातील करवसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नाहरकत प्रमाणपत्रासाठी नागरिक आणि उमेदवारांकडून करण्यात आलेल्या वाढत्या अर्जांमुळे करवसुलीने विक्रमी ८० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेपूर्वी नगरपरिषदेला अपेक्षापेक्षा अधिक महसूल मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंचा नारायण गडावर तर पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर होणार दसरा मेळावा

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवाशांनी भरलेली बस नाल्यात कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT