Auto Rickshaw overturns on Daryapur-Anjangaon Road in Amaravati saam Tv
महाराष्ट्र

Amaravati Accident: दर्यापूर-अंजनगाव मार्गावर मोठा अपघात; १० प्रवाशांना घेऊन जाणारी ऑटो उलटली

Tragic Amaravati Auto rickshaw Accident: दर्यापूर येथे शाळेच्या कामासाठी 10 जणांना घेऊन येणाऱ्या ऑटो रिक्षाचा अपघात झालाय. तामसवाडी फाट्याजवळ ऑटो उलटून हा अपघात झालाय.

Bharat Jadhav

अमर घटारे, साम प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील तामसवाडी फाट्याजवळ मोठा अपघात घडलाय. दहा प्रवाशांना घेऊन जाणारी ऑटो उलटून मोठा अपघात घडला. या अपघातात सर्व प्रवासी जखमी झालेत. यातील तीन जणांना गंभीर दुखापत झालीय. अपघातातील जखमींना तातडीने दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनगावाकडून दर्यापूरकडे येणाऱ्या ऑटोचा अपघात झाला. या ऑटोमध्ये १० प्रवासी होते. ते दर्यापूर येथे शाळेच्या कामानिमित्त येत होते. ऑटो तामसवाडी फाट्याजवळ आली असताना चालकाचं ऑटोवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात घडलाय. अपघाताची घटना घडताच तेथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती.

Amravati Accident

स्थानिकांनी अपघातातील जखमींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखलं केलं. डॉक्टरांच्यावतीने युद्ध पातळीवर उपचार सुरू आहेत. परंतु यातील तीन ते चार जखमींना अमरावती येथे पुढील उपचार करिता पाठवण्यात आले आहे. याबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर पंकज कोरडे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांची रांग

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

SCROLL FOR NEXT