OBC Reservation Over After Hyderabad Gazette GR Saam Tv
महाराष्ट्र

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Maharashtra Politics: बीडमधील महाएल्गार मेळाव्याआधीच छगन भुजबळांना धक्का बसलाय..कारण ओबीसी आंदोलनात फूट पडलीय... मात्र ओबीसी नेत्यांनी मेळाव्याकडे पाठ का फिरवलीय? आणि त्यावर भुजबळांनी नेमकी काय भूमिका घेतलीय?

Bharat Mohalkar

ओबीसी महाएल्गार मेळाव्याआधीच भुजबळांना मोठा धक्का बसलाय..कारण ओबीसी आंदोलनात फूट पडलीय.. अखिल भारतीय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे आणि विजय वडेट्टीवारांनी निमंत्रण नसल्याने बीडमधील महाएल्गार मेळाव्याकडे पाठ फिरवलीय.. एवढंच नाही तर भुजबळांना खोचक टोलाही लगावलाय..

खरंतर बीडमधील भुजबळांच्या मेळाव्याची अनेक दिवसांपासून तयारी करण्यात आलीय.. मात्र आता बॅनरवरच्या फोटोवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे...कारण बीडमध्ये मेळावा असूनही मेळाव्याच्या मुख्य स्टेजवरच्या बॅनरवरुन पंकजा मुंडेंचा फोटो वगळण्यात आलाय.. तर यामुळेच पंकजा मुंडेंनीही मेळाव्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगलीय..

याआधी रद्द केलेल्या ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवरही लक्ष्मण हाकेंचा फोटो वगळण्यात आला होता.. त्यावरुन हाकेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.. आता पुन्हा एकदा ओबीसी आंदोलनात फूट पडल्यानं हा लढा ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी आहे की राजकीय नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी, असाच सवाल आता निर्माण झालाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT