uddhav thackeray  Saam tv
महाराष्ट्र

ठाकरेंना रामराम ठोकण्याच्या तयारीत! त्या १० नगरसेवकांचा 'मास्टरस्ट्रोक'; काय घडतंय राजकीय वर्तुळात?

Dharashiv political news : धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. गटनेत्यासह सर्व १० नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती असून, सोलापूर येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Namdeo Kumbhar

Kalamb municipal council latest news : धाराशिवमधील राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. कळंब नगर परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाच्या सर्वच्या सर्व १० नगरसेवकांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार कैलास पाटील यांच्याच बालेकिल्ल्यात हा मोठा गेम झाल्यामुळे धाराशिवमध्ये ठाकरे गटाची ताकद कमालीची क्षीण झाली आहे. गटनेत्यासह ९ प्रत्यक्ष निवडून आलेले आणि १ स्वीकृत अशा सर्व १० नगरसेवकांनी सोलापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हातात घेण्याची तयारी दर्शवली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी आतापर्यंतचा सर्वांत मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या गटनेत्यासह सर्वच्या सर्व १० नगरसेवक आज भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल बोलावलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडेही या नगरसेवकांनी पाठ फिरवली होती. आज सोलापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

धाराशिवच्या कळंब नगर परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व नगरसेवक आज भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गटनेत्यासह सर्व नगरसेवकांचा आज सोलापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

यामध्ये थेट जनतेतून निवडून आलेले ९ नगरसेवक आणि १ स्वीकृत अशा एकूण १० नगरसेवकांचा समावेश असून ते आज हातामध्ये भाजपचे 'कमळ' धरणार आहेत. शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या मतदारसंघातील हे सर्व नगरसेवक असल्याने, हा त्यांच्यासाठी आणि ठाकरे गटासाठी धाराशिवमध्ये मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील वाकड पुलावर ओव्हरटेकच्या वादातून हाणामारी

Antara Banerjee : "ती मी नव्हेच..."; RPF कर्मचाऱ्यावर हल्ल्याप्रकरणी अभिनेत्री अंतरा बॅनर्जीचं स्पष्टीकरण

Railway tracks: रेल्वे रूळ कधीही गंजत का नाही?

Rain Alert : महाराष्ट्रात विजांसह वादळी पाऊस ; ४ जिल्ह्यांना येलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

मराठा सहकारी बँकेत कोट्यवधींचा महाघोटाळा, ४ अधिकारी अन् एजंटविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT