Gautami Patil Saam Tv
महाराष्ट्र

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठी घटना, पत्र्याचे शेड कोसळून 10 जण जखमी

Latest News: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यात ही घटना घडली आहे.

Priya More

Chhatrapati Sambhaji Nagar: संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या नृत्यांगणा गौतमी पाटीलची (Gautami Patil) क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोठी गर्दी करतात. सध्या गावोगावी गौतमीचे कार्यक्रम होत असून याच कार्यक्रमात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गौतमीच्या कार्यक्रमात पत्र्याचे छत कोसळून 10 जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महालगावात 8 मे रोजी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी गौतमी पाटील एका कापड दुकानाच्या उद्घाटनासाठी आली होती. यावेळी गौतमी पाटीलला पाहण्यासाठी साऱ्या गावानेच मोठी गर्दी केली होती. यावेळी गौतमीचा डान्स पाहण्यासाठी काही तरुण दुकानाच्या पत्र्यावर चढले होते. पण याच वेळी जास्त वजन झाल्यामुळे हे पत्र्याचे छत कोसळले.

पत्र्याचे छत कोसळताच त्यावर उभे राहिलेले 10 ते 15 तरुण छतासोबत खाली कोसळले. या घटनेत 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पण कोणाला गंभीर दुखापत झाली नसल्याचे देखील सांगितले जात आहे. या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. छत कोसळल्याची घटना घडल्यानंतर गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम तात्काळ थांबवण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Dry Fruits Storage Tips : ड्रायफ्रुट्स जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी जाणून घ्या या स्मार्ट स्टोरेज टिप्स

Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

Kim Jong : इराण-इस्त्राइल युद्धावेळी किम जोंग यांचा धमाका, थेट बॅलिस्टिक मिसाइल सोडली, शेजारच्या देशात हायअलर्ट

लिंबू सरबत की ऊसाचा रस, कडाक्याच्या उन्हात काय पिणं योग्य?

SCROLL FOR NEXT