Nandurbar News Today, Nandurbar Rain News, Nandurbar Weather Today Saam Tv
महाराष्ट्र

पुराने वेढा दिलेल्या वडफळी शासकीय आश्रम शाळेचे मोठे आर्थिक नुकसान

शासकीय कागदपत्रांसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य गेले वाहून

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - अक्कलकुवा अति दुर्गम भागातील शासकीय आश्रम शाळा वडफळी येथे मुसळधार पावसाने देवगंगा नदीला आलेल्या पुराने शाळेला वेडा घेतला होता. देव गंगा नदीचे पाणी शाळेच्या (School) इमारतीत व पटांगणातून वाहत नदीचे स्वरूप आले होते. दरम्यान गावातही पुराचे पाणी घुसल्याने अनेक घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. ((Nandurbar News Today))

हे देखील पाहा -

मोठ्या शर्तीने गावकरी व शाळा प्रशासनाने अडकलेल्या विद्यार्थ्यांना दोरीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविल्याने जीवित हानी टळली होती. मात्र प्रशासकीय कागदपत्रांसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वस्तू पेटी वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. तसेच धान्याच्या कोठारामध्ये पुराचे पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. शाळेच्या पटांगणात चिखल झाला आहे. शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते दरम्यान पुरामुळे बांधकाम साहित्य देखील वाहून गेले आहे. पावसाचा जोर कमी झाला असून वडफळी शासकीय आश्रम शाळेत नुकसान झाल्याच्या मालाची पंचनामा झाल्यानंतर सविस्तर माहिती समोर येणार आहे.

विशेष म्हणजे शासकीय आश्रम शाळा वडफळी देवगंगा नदीच्या कडेवर असल्याने शाळेला आणि वडफळी गावातील इतर पाड्यावर देखील नदीकिनारी संरक्षक भिंत नसल्याची बाब समोर आली आहे. संरक्षक भिंत नसल्यामुळे पुराचे पाणी गावात व शाळेत आल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याने अक्कलकुवा तालुक्यातील शाळांना दोन दिवस प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Nandurbar Rain News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT