latest politics news Saam Tv News
महाराष्ट्र

Politics: ठाकरेंना बालेकिल्ल्यात शिंदेंकडून 'दे धक्का'; निलेश राणेंच्या उपस्थितीत बड्या नेत्यासह कार्यकर्ते शिंदे गटात

Deputy Sarpanch Joins Shinde Faction: मसुरे उपसरपंच राजेश गावकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या ताकदीत मोठी भर.

Bhagyashree Kamble

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना, राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी घडताना दिसत आहेत. प्रत्येक पक्षाने मोर्चाबांधणी सुरू केली असून, शिवसेना ठाकरे गट यांच्या बालेकिल्ल्यालाही मोठा धक्का बसताना दिसत आहे. मालवणमध्ये ठाकरे गटाला शिंदे गटाने धक्का दिला असून, मसुरे विभागप्रमुख आणि उपसरपंच राजेश गावकर यांनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलं आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद आणखी वाढल्याचं बोललं जात आहे.

मसुरे विभागप्रमुख तथा उपसरपंच राजेश गावकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश केला आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला असून, यावेळी काही बडे नेते देखील उपस्थितीत होते.

उपसरपंच राजेश गावकर यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. यावेळी निलेश राणे यांनी, 'उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला अधिक बळ मिळालं आहे. ही संघटना अधिक वाढणार. राज्यात शिवसेना एक नंबरचा पक्ष करणार', असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT