Accident  Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

Accident News: वेगवान कार उलटून हा अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समृ्द्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर आज झालेल्या एका अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवान कार उलटून हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार औरंगाबादहून शेगावला जात होती. गाडीत एकूण 9 प्रवासी होते. मेहकरजवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर गाडीचा अपघात झाला. अपघातात 2 मुले 3 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 6 गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला होता. बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात जमली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

Gold Price Today : आज चांदी स्वस्त! सोन्याचे दर वाढले की घसरले? सुवर्णनगरीतील ताजे भाव जाणून घ्या

Shocking : भयंकर! बायको-पोरांसह ६ जणांची हत्या, आरोपीनं अख्ख्या कुटुंबाला संपवलं, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT