mahud gram panchayat sarpanch along with hundred karyakarta enters shivsena sangola saam tv
महाराष्ट्र

Shahajibapu Patil : शिवसेनेचा शेकापला धक्का, महुद ग्रामपंचायत संरपंचासह शेकडाे कार्यकर्त्यांना शहाजीबापूंनी केले आपलसं

भारत नागणे

Pandharpur :

सांगोला तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या महुद ग्रामपंचायतीचे (mahud grampanchayat) सरपंच आणि शेतकरी कामगार पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Mla Shahajibapu Patil) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे सांगाेला भागात सेनेची ताकद वाढली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील अनेक वर्षांपासून महुद ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व राहिले आहे. आमदार शहाजी पाटील यांनी या निमित्ताने शेकापच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी पाटील यांच्या समोर शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.‌ लोकसभा निवडणुकीच्या (loksabha election 2024) तोंडावरच शेकापच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने तालुक्याच्या उत्तर भागात शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची ताकद वाढल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

SCROLL FOR NEXT