Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीसाठी मोठी खेळी ! अजित पवार यांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी उभारणार? Video

महायुतीतील विरोधानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याची तयारी सुरू झालीय. छगन भुजबळ यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Bharat Jadhav

अजित पवार यांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी उभारण्याबाबत चाचपणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. वंचित बहुजन आघाडी, बच्चू कडू आणि इतर छोट्या पक्षांसोबत घेऊन अजित पवार नवी आघाडी उभारण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्यास लोकसभेसारखा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपनं अजित पवारांसोबत तिसरी आघाडी उभारण्याचा पर्याय ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

वंचित आणि एमआयएमसारख्या पक्षांसोबत तिसरी आघाडी उभी साहिल्यास याचा फटका थेट मविआला बसू शकतो. त्यामुळे भाजपनं आता सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी अजित पवारांचा वेगळ्या पद्धतीनं वापर करण्याची तयारी केल्याची चर्चा सुरू आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,छगन भुजबळांकडून शरद पवारांना तिसऱ्या आघाडीचा पर्याय दिलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये, भाजप नेत्यांचा सूर असल्याने ही चर्चा सुरू झालीय. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्यास महायुतीला फटका बसेल, असं म्हटलं जात आहे. महायुतीतील या सगळ्या विरोधानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याची तयारी सुरू केल्याचं म्हटलं जात आहे. तिसऱ्या आघाडीत अजित पवार यांची राष्ट्रवादी, वंचित, एमआयएम आणि इतर छोटे पक्ष यांना एकत्र करून विधानसभा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT