mahayuti  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, शिंदे गट, अजिदादांना किती जागा मिळणार?

Mahayuti Seat Sharing Formula : छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली असून विधानसभेचा फॉर्म्युला ठरला, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

Satish Daud

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची मंगळवारी रात्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महत्वाची बैठक पार पडली. हॉटेल रामामध्ये पार पडलेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली असून महायुतीचा विधानसभेचा फॉर्म्युला ठरला, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्राचा दौरा करून निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.

लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष देण्यात सुरुवात केली आहे. मंगळवारी अमित शहा मराठवाडा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल रामामध्ये महायुतीतील तिन्ही घटकपक्षातील नेत्यांची महत्वाची बैठक घेतली.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा झाली असून विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. आगामी निवडणुकीत भाजप 155 ते 160 जागा, शिवसेना शिंदे गट 80 ते 85 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 55 ते 60 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. या फॉर्म्युल्याबाबत महायुतीच्या नेत्यांकडून कुठलेही भाष्य करण्यात आले नाही.

दरम्यान, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. जागावाटपाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली. आम्ही सुरुवातीपासूनच सकारात्मक असून सर्वांच्या समन्वयाने जागावाटपाबाबत लवकरच निर्णय होईल. चर्चा सकारात्मक आहे. लवकरच निर्णय होईल. तुम्हाला लवकरच निर्णय कळेल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

बदलापूर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं. लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या, असं म्हणत आंदोलन करणारे विरोधक आज आरोपीची बाजू घेत आहेत. जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT