Maharashtra Cabinet  Social Media
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीचं खातेवाटप ठरलं? कोणाला कोणते खाते मिळणार? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Political News : महायुतीचं खातेवाटप ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या खातेवाटपात कोणाला कोणते खाते मिळणार, याविषयी माहिती हाती आली आहे. वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

Vishal Gangurde

गणेश कवडे, साम टीव्ही

मुंबई : महायुतीचं खातेवाटप अखेर ठरलं आहे. महायुतीच्या खातेवाटपावर येत्या २४ तासांत अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना देणार आहे. त्यामुळे राज्याचे नवे मंत्री लवकरच कामकाजाला लागणार आहेत.

महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी रविवारी नागपुरातील राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप २०, शिवसेनेकडे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे १० मंत्रिपदे असणार आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये २० नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही तरुण चेहऱ्यांनाही मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून नाराजीनाट्य देखील सुरु झाले आहे. दरम्यान, शपथविधीनंतर आता खातेवाटप कधी होणार, याची चर्चा सुरु असताना त्याबाबत मोठी माहिती हाती आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचे खातेवाटप ठरल्याची माहिती येत आहे. येत्या २४ तासांत महायुतीच्या खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. शिवसेना आज रात्रीच यादी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची यादी उद्या दिली जाणार आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना संपूर्ण खातेवाटपाची यादी देणार आहे.

कसे असेल महायुतीचं खातेवाटपं?

गेल्या मंत्रिमंडळातील महत्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार आहे. भाजपकडे गृह खाते राहणार आहे. तर शिवसेनेकडे नगरविकास खाते राहणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे अर्थ खाते कायम राहणार आहे. भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, उर्जा खाते राहणार आहे. शिवसेनेचे उत्पादन शुल्क खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाणार आहे. भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT