Maharastra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharastra Political News : 2019 मध्ये महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र राहिलेला साखरपट्टा भाजपनं भेदला. मात्र पक्षफुटीने बदललेली समीकरणं, लोकसभेच्या निकालात महायुतीला बसलेला फटका? यामुळे पश्चिम महाराष्ट्राची साखर महायुतीसाठी कडू ठरणार का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

साम टिव्ही

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. लोकसभेला 12 पैकी 7 महाविकास आघाडीचे खासदार निवडून आल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय. तर महायुती अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर 2014 नंतर भाजपवासी झालेल्या सहकार सम्राटांनी पुन्हा घरवापसीचे वेध लागले आहेत. त्यामुळे साखरपट्टा महायुतीसाठी कडू ठरण्याची शक्यता आहे. मात्र 2019 मध्ये साखरपट्ट्याचं राजकीय समीकरण काय पाहूयात.

पश्चिम महाराष्ट्रात 288 पैकी 70 जागा आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या 27, भाजप 20, काँग्रेस 12, शिवसेना 8 तर इतरांचा 6 जागांवर विजय झाला होता. अहमदनगर जिल्ह्यात कांदा आणि दूध दराचा मुद्दा डोकेदुखी वाढवणार असल्याचं बोललं जात आहे. तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसची वाढलेली ताकद आणि नेत्यांचा तुतारीकडील ओढा महत्वाचा आहे. लोकसभेत मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदेंच्या विजयामुळे सोलापूरमध्ये महायुतीचं आव्हान वाढलं आहे.

सांगलीत अपक्ष खासदार विशाल पाटील काँग्रेसमध्ये गेल्यानं महायुतीचं टेंशन वाढलं आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातील 8 मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. तर हर्षवर्धन पाटलांसारख्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्नामुळे महायुतीची कोंडी झाली आहे.

लोकसभेला साखरपट्ट्याने महाविकास आघाडीला साथ दिली. मात्र आता विधानसभेला दिग्गजांचा ओढा महाविकास आघाडीकडे असल्याने साखरपट्टा महायुतीसाठी कडू ठरणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2026: आयटीआर कधीपासून फाइल करता येणार? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Electricity Bill : वीज बिल हरवले? फक्त २ मिनिटांत मोबईल फोनवरून मिळेल, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update : जय पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

Airtel Recharge : खुशखबर! ५० रुपयांत OTT, IPLची मज्जा; एअरटेलचा भन्नाट रिचार्ज प्लान

नाशिकमध्ये खरात पार्ट 2 ! महिलांसोबतचे 121 व्हिडिओ; फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी

SCROLL FOR NEXT